
तालुकास्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूलला विजेतेपद
दापोली जिल्हा क्रीडा परिषद, क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित तालुकास्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. या संघाची जिल्हास्तरावर नविड झाली आहे. तर वराडकर महाविद्यालयाला उपविजेतेदावर यशस्वी खेळाडूंना मुख्याध्यापक अय्युब मुल्ला, प्रा. अशपाक खान यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचे मुस्लिम, एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, कनिष्ठ महाविद्यालय समिती अध्यक्ष आरिफ मेमन आदींनी कौतुक केले.www.konkantoday.com




