
शिवसेना महिला शहर संघटक सौ. पूजा पवार यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त “देवी मातांची दर्शन यात्रे”चे आयोजन
रत्नागिरी : शिवसेना महिला शहर संघटक सौ. पूजा दीपक पवार यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त २३ आणि २४ सप्टेंबर रोजी देवी मातांची दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
नवरात्रीमध्ये आदिशक्तीचे दर्शन घ्यायचे, ओटी भरायची, फुले वाहायची प्रत्येक महिलेची इच्छा असते. मात्र प्रत्येक वेळी काही कारणास्तव ही इच्छा अपुरी राहत असते. महिलांची हीच गोष्ट हेरून सौ. पूजा पवार यांनी सलग चौथ्या वर्षी रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ५ आणि ६ च्या महिलांसाठी ५ देवींच्या दर्शनाचा योग दरवर्षीप्रमाणे जुळवून आणला आहे.
सौ. पूजा पवार यांनी आयोजित केलेल्या देवी मातांची दर्शन यात्रेत शहरातील भगवती, अदिष्टी, नवलाई, महालक्ष्मी आणि साडेतीन शक्तिपिठांपैकी एक आडिवरेची महाकाली यांचा दर्शन सोहळा यांचा समावेश आहे.
या यात्रेसाठी महिलांची नोंदणी आवश्यक असून, तितक्या महिलांची नोंदणी होईल त्या सर्व महिलांना देवीदर्शन घडविण्यात येणार आहे. त्यासाठी २३ आणि २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आणि सकाळी १० वाजता अशा दोन एसी ट्रॅव्हल्स सोडण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान अल्पोपहारची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.
यात्रेसाठी नोंदणी आवश्यक असून आपली नावे नोंदवून आपली सीट बुक करावी आणि नोंदणीसाठी सौ. शिल्पा सुर्वे (८९७५८३८१८१), सौ. पूजा पवार (९२८४५२९८२७) सौ. शिवानी पवार (७७०९३८०९४७) सौ. अंजली सावंत (९२२६९३३७०४), सौ. काव्या कामतेकर (७०२००३७८२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




