
जयगड खूनप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी
जयगड परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने प्रकरणातील हलगर्जीपणाचा आरोप सिद्ध होताच जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली केली गेली. आता जयगड खून प्रकरणात अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांची सुद्धा पोलीस दलाकडून चौकशी चालू झालेली आहे.हे कर्मचारी जर दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप सोशल मिडियाव्दारे करण्यात येत होता. त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल असा शब्द दिला होता. या वक्तव्याला अनुसरूनच बदलीची कारवाई पार पडली. या संपूर्ण तपासाची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे होती.




