
संगमेश्वर तालुक्यातील चारजण बेपत्ता
रत्नागिरी, दि. 18 ) : संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांमधून चार जण बेपत्ता झाले आहेत. या व्यक्तींबाबत कोणाला माहिती मिळाल्यास किंवा त्यांचा शोध लागल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रदिप शंकर कदम वय- ५१ वर्षे रा. कोंडिवरे बौध्दवाडी, ता. संगमेश्वर हे दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी 10 वा. कोंडीवरे, बौध्दवाडी, ता. संगमेश्वर येथून नापत्ता झाले आहेत. त्यांची उंची 5 फुट 6 इंच, अंगाने सडपातळ, चेहेरा उभट, रंग सावळा, केस काळे/पांढरे, दाढी बारीक, मिशी तलवारकट, अंगामध्ये पांढ-या रंगाचा फुलशर्ट, नेसणीस काळया रंगाची फुलपॅन्ट, भाषा मराठी, हिंदी, दारु पीण्याचे व्यसन आहे.
विलास शिवराम कवळकर, वय-४८ वर्षे, रा. बुरंबाड कवळकरवाडी, ता.संगमेश्वर येथून दि. 10 जुलै 2022 रोजी सकाळी 10.30 वा. च्या दरम्यान बुरंबाड कवळकरवाडी ता.संगमेश्वर येथून नापत्ता झाले आहेत.
उंची 5 फुट 5 इंच, अंगाने सडपातळ, चेहेरा गोलट, रंग सावळा,केस काळे नेसणीस काळया रंगाची फुलपॅन्ट, अंगामध्ये काळया रंगाचे हाफ टी शर्ट, पायामध्ये पॅरागॉन कंपनीची रबरी चप्पल, शिक्षण नाही भाषा मराठी.
मधुकर काळया वाडकर. वय.67 रा. निढळेवाडी, ता. संगमेश्वर हे 15 ऑक्टोबर 2017 रोजी 7 वाजताच्या सुमारास रहात्या घरातून निढळेवाडी, संगमेश्वर येथून नापत्ता झालेले आहेत. उंची ५ फुट ५ इंच, बांधा- सडपातळ चेहरा- उभट, रंग- काळा, केस पिकलेले पांढरे, मिशी जाड, नेसणीस फुलशर्ट,फुलपॅन्ट, पायात काळया रंगाची प्लास्टीक चप्पल, सोबत कापडी पिशवी त्यामध्ये सुतार कामाची हत्यारे मराठी भाषा स्पष्ट बोलतात.
बेबीताई हनुमंत जाधव वय-७४ वर्षे मुळ रा. भिलवडी रेल्वे स्टेशन ता. पलुस जि.सांगली सध्या रा.पावटा मैदान संगमेश्वर ता.संगमेश्वर येथून दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 च्या सुमारास नापत्ता झाल्या आहेत. उंची ४ फुट ९ इंच रंग सावळा, बांधा सडपातळ, केस- पांढरेतांबडे डोळे- काळे, नेसणीस हिरव्या रंगाची नऊवारी साडी, व हिरव्या रंगाचा ब्लाउज, डाव्या हाताच्या मनगटावर बेबीताई हनुमंत जाधव असे गोंदलेले आहे. पायात पॅराकॉनची पांढऱ्या रंगाची स्लीपर, डाव्या गालावर चामखीळ, भाषा मराठी, जात, हिंदु गोसावी.
000