
संगमेश्वरमधील नुतनीकरण झालेले बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध
संगमेश्वर पंचक्रोशीतील प्रवाशांना दिलासा मिळावा या उद्देशाने संगमेश्वर बसस्थानकाचे नुतनीकरण पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून नुकतेच झाले. आधुनिक सुविधा असलेले हे नवे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र अद्यापही देवरूख आगारांकडून या बसस्थानकाला पुरेशा प्रमाणात बसफेर्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
सध्या विद्यार्थ्यांसाठी तसेच आडगावातील प्रवाशांसाठी पूर्वी सुरू असलेल्या अनेक फेर्या भारमान कमी या कारणास्तव बंद करण्यात आल्या आहेत. याचा फटका ग्रामीण प्रवाशांना बसत असून दैनंदिन प्रवास अधिक कटकटीचा झाला आहे. विशेष म्हणजे संगमेश्वर-बेळगाव-देवरूख अशी महत्वाची बसफेरी देखील आता संगमेश्वर बसस्थानकात येत नाही. ही बस देवरूख येथेच थांबवली जाते. त्यामुळे संगमेश्वरहून या मार्गावर प्रवास करणार्या नागरिकांना बससेवेअभावी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
www.konkantoday.com




