
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभकेवळ 15 दिवसांसाठी अभियान न करता वर्षभर राबवानर्सिंग कॉलेजसाठी शासनाकडून 13 कोटी मंजूर करुन आणू–पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. 17 ) : स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान केवळ 15 दिवसापुरते न राबविता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षभर राबवा. आरोग्य विभागाने सर्व लाभ, सर्व सुविधा या मोहिमेंतर्गत महिलांना द्यावी, त्याबाबत गावागावातून जनजागृतीही करावी, असे आवाहन करतानाच नर्सिंग कॉलेजच्या इमारतीसाठी आवश्यक असणारा 13 कोटी रुपयांचा निधी येत्या काही दिवसात शासनाकडून मंजूर करुन आणला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. जिज्ञासा भाटीया, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, नगराध्यक्ष राहूल पंडीत, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, सिव्हील हॉस्पीटल, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांनी एकत्रित काम करुन आरोग्याच्या सुविधा महिलांना द्याव्यात. कुपोषित बालकांची संख्या शून्य करावी. त्याचबरोबर कुपोषित माता आहेत का याचाही तपासणी करावी. त्यांना देखील सशक्त करायला हवे. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाचे काम राज्यांनी पाहिले आहे. हॉस्पीटलमध्ये रुग्णांसाठी देव होऊन काम करत होता. अशा महामारीतून महाराष्ट्र बाहेर पडला कारण पोलीस, आरोग्य विभागाने चांगले काम केले. कॅन्सरपासून स्त्रींयाचे संरक्षण करण्याचे काम एचपीव्ही लस करते. जिल्ह्यातील 9 ते 14 वर्षे वयोगटातील 50 हजार मुलींसाठी हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल. महिलांना, मातांना, मुलींना आरोग्य विभागाने आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. महिलांनी देखील आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. शासकीय रुग्णालयांने परिसर स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप, अधिष्ठाता डॉ. भाटिया यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील धन्वंतरी मूर्तीचे पूजन करण्यात आले.
000




