
शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनतर्फे दहा शिक्षकांचा गौरव
निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण व वार्षिक बुलेटिन रत्नांकुरचे प्रकाशन


रत्नागिरी : शिक्षक दिनाच्या औचित्याने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन तर्फे आयोजित कार्यक्रमात रत्नागिरी तालुक्यातील दहा उत्कृष्ट शिक्षकांना “टीचर एक्सलन्स अवॉर्ड”ने सन्मानित करण्यात आले. तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूल व सर्वंकष विद्या मंदिर येथे आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. ही स्पर्धा रोटरी क्लब अल्ट्रिंचम (यू.के.) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.
याच कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे वार्षिक बुलेटिन “रत्नांकुर”चे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नोमिनी (DGN) रोटे अशोक नाईक होते. अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्षा रोटे डॉ. स्वप्ना करें होत्या. रोटे राजेंद्र कदम (क्लब सचिव), निबंध स्पर्धा प्रमुख रोटे सिताराम सावंत, रत्नापूरचे संपादक व आयपी रोटेरियन हिराकांत साळवी यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे तांत्रिक सहाय्य रोटेरियन रोहित पाटील व रोटेरियन अथर्व शेट्ये यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कु. प्रांजली चोप्रा हिने केले. रोटेरियन विनायक निकम व रोटेरियन अस्मिता चोप्रा यांनी शिक्षक गौरव पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
या प्रसंगी रोटेरियन गांधी, रोटेरियन लाड, रोटेरियन हृषीकेश, रोटेरियन अमर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर काही शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लबच्या उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक केले व समाजोपयोगी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनने शिक्षक दिनाच्या औचित्याने आयोजित केलेला हा उपक्रम शिक्षकांचा सन्मान करणारा, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा व रोटरीच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला.




