
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती करावी
ग्रामविकास राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद चाचे यांची आग्रही मागणी
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असून रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मिलिंद चाचे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, कोकण परिसरमध्ये पर्जन्यमान जास्त असते. अति प्रमाणात झालेल्या पावसामुळे गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यांची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी. तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणाऱ्या गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची पाहणी करून त्वरित जागृती करण्याच्या सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागात द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.