
कोकण मार्गावर चालवलेल्या ३८२ गणपती स्पेशलच्या फेर्यांमधून यंदा १४ कोटी ४६ लाख रुपयांची कमाई
गणेशोत्सवासाठी मध्य, कोकण, पश्चिम रेल्वे प्रशासनाने २२ ऑगस्टपासून १० सप्टेंबरपर्यंत कोकण मार्गावर चालवलेल्या ३८२ गणपती स्पेशलच्या फेर्यांमधून यंदा १४ कोटी ४६ लाख रूपयांची कमाई झाली. गणपती स्पेशलच्या फेर्यांमधून २ लाख १६ हजार प्रवाशांनी प्रवास केला. विक्रमी गर्दीने धावणार्या गणपती स्पेशलच्या फेर्यांमधून रेटारेटीचा अन् लोंबकळत प्रवास पदरी पडलेला असतानाही गणेशभक्तांनी रेल्वेगाड्यांतूनच प्रवास करण्यास पसंती दिल्यामुळे सर्वाधिक उत्पन्न रेल्वे प्रशासनाच्या पदरात पडले.
मध्य, कोकण व पश्चिम रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी तब्बल ३८२ गणपती स्पेशलच्या फेर्यांचे नेटके नियोजन केले. २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत नियमितपणे धावलेल्या दोन्ही मेमू स्पेशलच्या फेर्यांना गणेशभक्तांचा भरभान प्रतिसाद लाभला. या फेर्यांमधूनही रेल्वे प्रशासनाला विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले.
मध्य रेल्वेला कोकण मार्गावान धावलेल्या गणपती स्पेशलच्या ३२६ फेर्यांमधून १२ कोटी १३ लाख ४१ हजार ५४० प्पयांचा महसूल मिळाला. १ लाख ६९ हजार ५९५ गणेशभक्तांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे.
www.konkantoday.com




