
रत्नागिरी जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त उत्पादने आता या ई-मार्टवर उपलब्ध होणार
’उमेद’ अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध लघुद्योगांना चालना दिली जाते. आता या लघुद्योगांमधून तयार होणारी उत्पादने आता जगभराच्या बाजारपेठेत पदार्पण करणार आहेत. ई-मार्टच्या माध्यमातून आता ’उमेद’ ची ही उत्पादने फक्त भारतातच नाही तर जगभरात कुठेही आपल्याला खरेदी करता येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त उत्पादने आता या ई-मार्टवर उपलब्ध होणार आहेत. ई-मार्ट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आवश्यक पॅकेजींग आणि लॅब टेस्टींगची सुविधा श्री छत्रपती शिवाजी सभागृह रत्नागिरी आता लवकरच चिपळुणातील खेर्डी एमआयडीसीत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महिलांची ही उत्पादने सर्व निकषात पात्र ठरतील.www.konkantoday.com




