
दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. निहा आनंद साळवी यांची निवड
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गोळप सडा साळवी नगर रत्नागिरी दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाची सभा नुकतीच उत्साहात झाली. या सभेत दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्ष पदी सौ. निहा आनंद साळवी यांची एकमुखाने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी सौ. शालिनी गुरुनाथ झगडे, सचिव सौ. सुचिता सुभाष शेलार यांची निवड करण्यात आली. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.




