पाण्याचे योग्य नियोजन केले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


भारतात पाण्याची कमी नसून पाण्याच्या नियोजनाची मोठी कमतरता आहे. पाण्याचे योग्य नियोजन केले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. पाणी हाच येणाऱ्या काळातील कळीचा मुद्दा असणार आहे.त्यामुळे पाण्याच्या नियोजनाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नाम फाउंडेशन दशकपूर्ती समारंभात ते बोलत होते. यावेळी पद्मभूषण डॉ. विजय भटकर, ‘नाम’चे संस्थापक अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे मंत्री चंद्रकांत पाटील व उदय सामंत उपस्थित होते.शताब्दी वर्षानिमित्त गीता धर्म मंडळाच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रविवारी (दि. १४) ‘गीताधर्मव्रती’ हा विशेष पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. मुकुंद दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यासह राष्ट्रसेविका समिती, नागपूरच्यावतीने देण्यात येणारा ‘वंदनीय ताई आपटे पुरस्कार’ प्रख्यात निरूपणकार मोहना चितळे यांना गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या सहप्रमुख चित्रा जोशी, कार्यवाह विनया मेहेंदळे, शैलजा कात्रे उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button