इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम, तर राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. लज्जा भट्ट यांची निवड

रत्नागिरी : शिक्षणाच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी माहीती व तंत्रज्ञान युगातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकाची समतावादी संघटना इंडियन स्टुडंट कौन्सिलची ऑनलाईन पद्धतीने डॉ. मिता रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये मागील कार्यक्रमाचा आढावा व इतिवृत्त प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम यांनी सादर केले. यावेळी सर्वानुमते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्याची नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
कार्यकारणीची पुढीलप्रमाणे : राष्ट्रीय अध्यक्ष- प्रा. डॉ. लज्जा भट्ट, उपाध्यक्ष- डॉ. नीता रॉय,
कार्यवाह- डॉ. सरीता मालविया, सहकार्यवाह- प्रा. वैशाली दामले, संघटक- डॉ. मेहनतेश,
सहसंघटक- तंद्रा भट्टाचार्यजी, कार्यालयीन सचिव- श्रीकांत पंचगुडे.
महाराष्ट्र राज्य कार्यकारणी : अध्यक्ष- प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम, उपाध्यक्ष – प्रा. माधुरी राऊत, कार्यवाह- प्रा. डॉ. धनाजी थोरे, सहकार्यवाह- प्रा. डॉ. रोहित गायकवाड, संघटक – सोनिया इथापे, सहसंघटक अंजली कुंदरगी, कार्यालयीन सचिव – अश्विनी दीक्षित, प्रसिद्धी प्रमुख- सुवर्णा शिंदे, सारीका शिंदे.
प्रमुख विद्यापीठाचे संघटक : मुंबई विद्यापीठ मुंबई संघटक- प्रा. डॉ. निवेदिता नाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघटक – प्रा. डॉ. शीला स्वामी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संघटक – प्रा. डॉ. माधवी महाके, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती – प्रा. डॉ. रेखा बडोदेकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर – हेमलता पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे – प्रा. डॉ. राजश्री देशपांडे. सल्लागार- डॉ. बाबा आढाव (पुणे), डॉ. मिता रामटेके (ब्रह्मपुरी) यांची निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button