
ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने “माझं कुंकू माझा देश” आंदोलन

भारत-पाकिस्तान क्रिकेट खेळवणाऱ्या सरकारच्या दुटप्पी धोरणाचा ठाकरे शिवसेनेकडून निषेध
रत्नागिरी : दिनांक २२ एप्रिल रोजी पाकिस्तानने पहेलगांवर दहशतवादी हल्ला करून २७ नागरिकांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर भारतानेही पलटवार करत पाकिस्तानला चोख उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर राबविले; मात्र तरीही आज भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळावा यासाठी परवानगीही दिली. सरकारच्या या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने “माझं कुंकू माझा देश” हे आंदोलन करण्यात आले.
ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले मारुती मंदिर येथे एकत्र येत सरकार विरोधी घोषणा केल्या आणि सरकारच्या या दुटप्पी धोरणाबाबत निषेध व्यक्त केला.
महिला आघाडीच्या वतीने बोलताना पूजा जाधव म्हणाल्या, “पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातल्या 27 नागरिकांचा हकनाक बळी गेला. असे असतानाही देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा आणि बीसीसीआयचा अध्यक्ष जय शहा यांनी भारताने क्रिकेट सोबत सामना खेळण्यास परवानगी देणे म्हणजे दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हा अन्याय आहे. यासाठी ते तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत आणि याचे उत्तरही तुम्हाला द्यावे लागेल. आम्ही दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत आहोत हेच सांगण्यासाठी “माझं कुंकू माझं देश” या आंदोलनाच्या माध्यमातून आज रस्त्यावर उतरलो आहोत.”
विधानसभा क्षेत्र संघटक सायली पवार यांनीही या गोष्टीचा निषेध करताना तहलगाम हल्ल्यात महिला भगिनींचे कुंकू हिरावून घेणाऱ्या आणि त्यांचे कुटुंब उध्वस्त करणाऱ्या पाकिस्तानबरोबरच भारताने सामना खेळण्यासारखे दुर्दैवी गोष्ट नाहीनसल्याची खंत व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसेना उपनेते आणि माजी आमदार बाळ माने, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, नितीन तळेकर, माजी नगरसेविका सौ. रशिदा गोदड, माजी नगरसेविका सौ. राजश्री शिवलकर, उपजिल्हा संघटक ममता जोशी, उप शहर संघटक सेजल बोराटे, उन्नती कोळेकर, विजया घुडे, पूजा जाधव, मेघा मोहिते, सुवर्णा शिरधनकर, संगिता मयेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.