शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढून घ्यावा- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले


रत्नागिरी, दि. 12:- कृषी विभागामार्फत विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींच्या खरेदीसाठी, विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य करण्यात येते. कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल प्रणाली विकसित केली आहे. या योजनांचा लाभ घेण्याकरीता अॕग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. अॕग्रीस्टॅक फार्मर आयडी नसल्यास नजीकच्या सीएससी सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अॕग्रीस्टॅक फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उत्पादनक्षमता वाढविणे, श्रम बचत करणे व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. जिल्हयामध्ये प्रामुख्याने पॉवर टिलर, पॉवर विडर, ग्रास कटर, चेन सॉ, पॉवर स्प्रेअर, मात मळणी यंत्र या यंत्राची मागणी जास्त प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी ०२२-६१३१६४२९ या हेल्पलाईन क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजता संपर्क करावा तसेच सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य या पध्दतीने जिल्हयातील 5 हजार 205 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या यंत्र/अवजारांसाठी आवश्यक कागदपत्र ( दरपत्रक, टेस्ट रिपोर्ट, जात प्रमाणपत्र ) महाडीबीटी पोर्टलवर अॅग्रीस्टॅक फार्मर आयडीने लॉगीन करुन आपली निवड झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अपलोड करावेत अन्यथा महाडीबीटी पोर्टलव्दारे आपला अर्ज रद्द करण्यात येवून लाभापासून वंचित राहू शकता. शेतकऱ्यांनी तात्काळ कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला, दिव्यांग, अनूसुचित जाती, अनूसुचित जमाती व इतर शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरव्दारे अर्ज करावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button