
नेपाळ येथील मानसिक स्वास्थ बिघडलेल्या तरुणाचा जिल्हा रुग्णालयात गोंधळ, ड्रेसिंग साठी लागणारा चिमटा घेऊन डॉक्टरांच्या मागे लागला
रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात रेल्वस्टेशन येथून आलेल्या माथेफिरू तरुणाने गोंधळ घातला. चक्क तेथील वैद्यकीय अधिकार्यांच्या ड्रेसिंगसाठी वापरल्या जाणार्या चिमटा मारण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि जिल्हापरिषद कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती.
मुंशी काळू गोडिया ( 27, रा. नेपाळ) असे या मानसिक स्वास्थ बिघडलेल्या माथेफिरूचे नाव आहे. ही घटना बुधवारी घडली. मुंशी याने दुपारी रेल्वे स्टेशन येथे गोधंळ घातला स्वतःच्या मानेवर कापून घेतले होते. उपचारासाठी पोलिसांनी रुग्णवाहिकेन जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.माथेफिरु हा ड्रेसिंग करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आला होता. वैद्यकीय अधिकार्यांनी त्याच्या जखमेवर ड्रेसिंग केल्यानंतर त्याने अचानक वैद्यकीय अधिकार्यावरच हल्ला केला. त्याने ड्रेसिंगसाठी वापरला जाणारा चिमटा घेऊन डॉक्टरांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो हॉस्पिटलच्या बाहेर आला आणि रस्त्यावर गोंधळ घालू लागला. हातामध्ये दगड आणि फरशीचा तुकडा घेऊन तो नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देत होता. हातात दगड आणि फरशीचा तुकडा घेऊन तो तुम्ही सगळे मरणार असे ओरडत नागरिकांच्या अंगावर धावत होता. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करणार्या लोकांनाही तो धमकावत होता. यामुळे हॉस्पिटल परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले.
याच गोंधळात जिल्हा परिषद कर्मचारी राजू जाधव हे आपल्या वरिष्टांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. त्यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि पुढे सरसावले त्यांच्या मदतीला जिल्हा रुग्णालयाचे पोलिस आणि कर्मचारी अमित जाधव देखील धावले. दोघांनी मिळून मोठ्या धाडसाने त्या माथेफिरु व्यक्तीला पकडले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या या समयसुचकतेमुळे आणि धाडसामुळे कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आली. या अचानक घडलेल्या प्रकाराने काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.




