
खेड तालुक्यातील कोंडीवलीचे सुपुत्र योगेश शिंदे योगासन स्पर्धेत राज्यात अव्वल
खेड तालुक्यातील कोंडीवलीचे सुपुत्र व शिव बुद्रूक येथील ए. ई. कालसेकर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कार्यरत असलेले शिक्षक योगेश शिंदे यांनी सुपाईन योगा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत राज्यात अव्वलस्थान मिळवले. या यशामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संभाजी नगर (औरंगाबाद) येथे झालेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेत ४५ ते ५५ वयोगटापर्यंत सुवर्णपदक योगेश शिंदे यांनी उत्तम सादरीकरण करत राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांनी तुल्यबळ लढत देत सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेतील अव्वल कामगिरीमुळे विजयवाडा आंध्रप्रदेश येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत.www.konkantoday.com




