
गावाची ओढ, गावाची माती विसरू नये : विपुल कदम
“जनतेसाठी आपण शिवसेना पक्षामार्फत विकास कामे करतोय., विविध उपक्रम राबवतोय. जे लोक कामधंदानिमित्ताने मुंबई, पुणे येथे गेले आहेत आणि गणपती, शिमगोत्सव सणानिमित्त गावी येतात, काही क्षण अनुभवतात त्यांनी गावाची ओढ, गावाची माती विसरू नये,” असे आवाहन शिवसेनेचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल (दादा) लक्ष्मण कदम यांनी केले.
शिवसेना युवा सेना यांच्या वतीने गुहागर तालुका मर्यादित पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम पुरस्कृत शिवसेना, गुहागर तालुका मर्यादित पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा गुहागर तालुक्यातील शांताई रिसॉर्ट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
यावेळी बोलताना विपुल कदम पुढे म्हणाले की, प्रत्येकाला गावाची ओढ लागावी यासाठी आपण विविध प्रकारचे कार्यक्रम राबवित आहोत. यासाठी तुमची आवड महत्त्वाची आहे. आपण राबवलेल्या इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेला सर्व स्पर्धकांनी मान दिलात त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो, असे सांगून विपुल (दादा) कदम यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, माजी जि.प. सदस्य सौ. नेत्रा ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्ष निरीक्षक अनुराग उतेकर, युवा सेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे, गुहागर तालुका महिला प्रमुख ॲड. ज्योत्स्ना काताळकर, गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, प्रदीप सुर्वे, गुहागर विधानसभा ७२ गाव युवा सेना तालुकाप्रमुख विक्रांत चव्हाण, अमोल गोयथळे, ॲड. संतोष आग्रे, सागर गुजर, महेश जामसुतकर, योगेश कदम, कुणाल देसाई, सुशील जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.




