
चिपळुणात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर, सामाजिक कार्यकर्ते दादा खातू यांच्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
दोन वेळा भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर लाखोंचा खर्च करूनही शहरात त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नाक्यानाक्यावर, आडोशाला व रस्त्यांवर ही कुत्री झुंडीने फिरताना दिसतात. पादचारी, लहान मुले, विद्यार्थी व आबालवृद्ध यांना कुत्र्यांनी चावा घेणे, पाठलाग करणे, वाहनदारकांना घाबरवून अपघात घडविण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी दोन भटक्या कुत्र्यांनी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक दादा खातू यांच्यावर हल्ला चढवित त्यांना जखमी केले. या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. सध्या खातू यांच्यावर कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.www.konkantoday.com




