
राजापूर येथे मुंबई-गोवा महामार्गावर बसणार्या गुरांच्या मालकांवर कारवाई करा
मुंबई-गोवा महार्गावर वाटूळपासून ते पुढे हातिवले टोलनाका ते पन्हळे टाकवाडी, खारेपाटणपर्यंत मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर फिरणार्या मोकाट गुरांमुळे वारंवार अपघात होत आहेत. यात जनावरे जखमी होत आहेत तर काही मृत्युमुखीही पडत आहेत. अपघात होऊन वाहन चालकांसह प्रवाशांच्या जिवीतासही धोका निर्माण होत आहे. यासाठी या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा तसेच त्यांच्या मालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी हातिवले टोल नाक्यावर स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, वाहन चालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी पोलीस तसेच बांधकाम विभागाला मागणीचे निवेदन सादर केले.www.konkantoday.com




