
कॉंग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचवा, जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग
आगामी नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसने सोमवारी शहरातील धवल प्लाझा सभागृहात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन शिबीर पार पडले. या वेळी आगामी स्वायत्त संस्था निवडणुकांसंदर्भात आढावा घेतानाच कॉंग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचवून संघटनेची मजबूत बांधणी करा, असा सल्ला जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग व नुरूद्दीन सय्यद यांनी दिला.
कॉंग्रेसच्या उत्तर रत्नागिणी जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग यांगी-पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच सर्व पदाधिकार्यांच मार्गदर्शन शिबीर चिपळुणात आयोजित केले होते. या शिबिराच्या सुरवातीला घाग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी दक्षिण रत्नागिरीच जिल्हाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह जिल्ह्यातील शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com




