
श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल निमंत्रित
श्रीलका स्टिअरिंग कमिटी फॉर नलेनी फोरम व आंतरराष्ट्रीय नियोजन समिती फॉर फूड सोव्हरिन्टी यांच्यावतीने फोरममध्ये सहभागी होण्यासाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही परिषद नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कँडी, श्रीलंका येथे होणार असून आशिया खंडातील मच्छीमारांचे नेतृत्त्व करण्याची संधी तांडेल यांना लाभली असून ते परिषदेला रवाना झाले आहेत.
ही परिषद १४ सप्टेंबरपर्यंत असून जगातील वाणिज्य, व्यापार, अन्न व मत्स्य सुरक्षा आणि सहकारी विकास मंत्रालयाच्या अखत्यारित होणार आहे. या फोरममध्ये जगभरातील शेतकरी नेते, मच्छीमार नेते, अन्न सार्वभौमत्वाचे पुरस्कर्ते, नागरी समाजातील कार्यकर्ते व धोरण निर्माते सहभागी होणार आहेत.www.konkantoday.com




