
भक्ती मयेकरसह तिहेरी हत्याकांडाची केस कोर्टात फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना कडक शिक्षा द्यावी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील भक्ती मयेकर व इतर हत्या करणाऱ्या आरोपीला कोर्टात फास्ट ट्रॅकवर केस चालवून कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिला सायली बारमध्ये ठार मारून तिचा मृतदेह आंबा घाटात दरीत टाकल्याने पोलीस तपासात आरोपी दुर्वास पाटील व इतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात आणखी दोन हत्या केल्याचे कबुल केल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आपले, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक, जयगड पोलीस निरीक्षक व सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सर्वप्रथम अभिनंदन.
या तिहेरी हत्याकांडाने रत्नागिरी हादरली आहे. या घटना पुन्हा घडू नयेत व इतर आरोपी पुन्हा निर्माण होवू नयेत यासाठी आपण या प्रकरणाचा आणखीन सखोल तपास करावा व आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेतर्फे करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते बाळासाहेब माने, रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, उप तालुका प्रमुख सुभाष पावसकर, सुभाष रहाटे, महेंद्र चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख संदेश नारगुडे, उप शहर प्रमुख सलिल डाफळे, नितिन तळेकर, विभाग प्रमुख मयूरेश्वर पाटील, किरण तोडणकर, शशिकांत बारगोडे, चंद्रकांत साळवी, अमित खडसोडे, प्रशांत सुर्वे, शकील महालदार, साजिद पावसकर, प्रवीण शिवलकर, दिलावर गोदड, महिला उपशहर संघटक सेजल बोराटे, माजी नगरसेविका रशीदा गोदड, राजश्री शिवलकर, विजया घुडे, राजश्री लोटनकर, रेश्मा कोळंबेकर, युक्ता आंबेकर, रमीजा तांडेल, रंजना ढेपसे, रिहाना मुजावर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.