
गुहागर तालुक्यातील बेपत्ता व्यक्तींविषयी पोलीसांचे आवाहन
*रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील विविध गावांमधून काही व्यक्ती वेगवेगळ्या कालावधीत नापत्ता झाल्या आहेत. संबंधित व्यक्तींबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक गुहागर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
गणपत काशिराम गावणंग, वय 51 वर्षे, रा. उंबराठ, डागवाडी, ता. गुहागर जि. रत्नागिरी, हे 7 जुलै 2024 रोजी रात्रौ 9 वाजता ते 8 जुलै 2024 रोजी पहाटे 4.30 वा. या दरम्यान चिंद्रावळे, ता. गुहागर येथून नापत्ता झाले आहेत. त्यांचा रंग सावळा, अंगाने सडपातळ, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे कापलेले उंची 5 फुट 5 इंच, नेसणीस खाकी रंगाचा फुल बाहयांचा शर्ट व खाकी रंगाची हाफ पॅन्ट त्यावर हिरव्या पांढऱ्या रंगाचा टॉवेल काळया रंगाची टोपी अंगावर मौल्यवान वस्तु नाही. मोबाईल वापरत नाही.
गणपत गोविंद मुकनाक, वय 75 वर्षे, रा.निवोशी गणेशवाडी, ता. गुहागर हे दि. 20 ऑक्टोबर 2019 रोजी निवोशी गणेशवाडी ता. गुहागर येथून नापत्ता झाले आहेत. उंची – 5 फुट, वर्ण-सावळा, अंगाने-सडपातळ, चेहरा-उभट, नाक-सरळ, केस पांढरे, दाढी मिशी-पांढरी पडलेली, अंगात-पांढऱ्या रंगाचा हाफ हाताचा टी-शर्ट व काळया रंगाची पँट.
प्रमोद महादेव पालांडे वय ४७ रा.पाटपन्हाळे,गणेशवाडी ता.गुहागर हे 7 एप्रिल 2021 रोजी पाटपन्हाळे, गणेशवाडी येथून नापत्ता झाले आहेत. त्यांचे वय 47 वर्षे, रंगाने गव्हाळ, उंची 5 फुट 6 इंच, अंगाने सडपातळ,चेहारा उभट, दाढी वाढलेली व अर्धवट पिकलेली, मिशी पिकलेली, अंगात हाफ शर्ट, नेसणीस हाफ पॅन्ट, शिक्षण 8 वी
संदेश शंकर पवार वय ३० वर्षे रा.अंजनवेल, मराठवाडी ता. गुहागर हे अंजनवेल मधीली मराठवाडी येथून 15 डिसेंबर 2012 रोजी नापत्ता झाले आहेत . बांधा- अंगाने मध्यम, उंची सुमारे ५ फुट, रंग गव्हाळ, चेहरा उभट, मिशी वाढलेली, नेसणीस आत टि शर्ट व फुल पॅन्ट पायात स्लीपर, शिक्षण नाही.
सुनंदा नामदेव मुरमुरे वय 60 वर्षे रा.दोडवली, नामदेववाडी ता. गुहागर या त्यांच्या राहत्या घरातून 13 मार्च 2023 रोजी 19.22 वाजता नापत्ता झाल्या आहेत. त्यांची उंची 50फुट 4 इंच, अंगाने मध्यम, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, केस लांब काळे, नेसणीस नऊवारी साडी, अंगात ब्लाऊज, गळयात मंगळसुत्र, पायात चप्पल, अंगात इतर मौल्यवान चीजवस्तु नाहीत हातात काचेच्या बांगडया कानात साधी कर्णफुले.
विनीता शंकर वेलुंडे वय 51 वर्षे रा.सडे जांभारी खालचीवाडी ता. गुहागर या 8 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजता सडे जांभारी खालची वाडी, गुहागर येथून नापत्ता झाल्या आहेत. त्यांची उंची 5 फुट, बांधा सडपातळ, रंग सावळा, डोळे काळे, केस काळे, नेसणीस लाल रंगाचा गाऊन, कपाळावर लाल कुंकुचा गोल टिळा, शिक्षण नाही