
“आपलं गुहागर”कडून आज गुहागर येथे बैठकीचे आयोजन
गुहागर तालुक्यातील नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या आणि प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी “आपलं गुहागर” व्हाट्सअप ग्रुप हे हक्काचे व्यासपीठ असून हे व्यासपीठ गुहागरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवतेज फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष व प्रसिद्ध वकील ॲड. संकेत साळवी यांच्या संकलनेतून आणि पुढाकाराने निर्माण करण्यात आले आहे.
“आपलं गुहागर” व्हाट्सअप ग्रुप हा समाजाच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यासपीठावर एकत्र आलेल्या सर्व जागरूक नागरिकांनी तसेच समूहांमध्ये सामील नसलेल्या नागरिकांनीही गुहागर तालुक्यात असलेल्या अनेक समस्यांपैकी प्रामुख्याने रस्त्यांवरचे खड्डे आणि मोकाट गुरे यांसारख्या भेडसावणाऱ्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आज (८ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता गुहागर येथील ज्ञान रश्मी वाचनालय येथे महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला गुहागरमधील नागरिकांनी आणि “आपलं गुहागर” व्हाट्सअप या ग्रुपच्या सर्व सभासदांनी या बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. संकेत साळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




