
मनसेचे माजी नेते वैभव खेडेकरांसह समर्थकांचा भाजप पक्षप्रवेश लांबला
मनसचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांनी ४ सप्टेंबर रोजी नरिमन पॉईंट मुंबई येथील भाजपच्या प्रवेश कार्यालयात होणार्या पक्षप्रवेशाची जय्यत तयारी केलेली असतानाच हा पक्षप्रवेश सोहळा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून कळवण्यात आले आहे. मराठा-ओबीसी आरक्षण मुद्दा चिघळल्याचे कारण देण्यात आले असून लवकरच पुढील तारीख कळवण्यात येईल, असेही प्रवेशकर्त्याना सूचित करण्यात आले आहे.
वैभव खेडेकर व समर्थकांनी गृहप्रवेशाची जय्यत तयारी सुरू केली होती. गुरूवारी सकाळी शेकडो कार्यकर्त्यांसह ताफा पक्षप्रवेश सोहळ्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार होता. मात्र आरक्षण मुद्दा चिघळल्यामुळे पक्षप्रवेश सोहळा तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आल्याने जय्यत तयारीवर पाणी फेरले आहे. पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मनसेतील ९० टक्के कार्यकर्ते आपल्या सोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा खेडेकर यांनी केला आहे.www.konkantoday.com




