
मराठा आरक्षण जीआर रद्द करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ओबीसी जनमोर्चाने तीव्र विरोध करत निषेध नोंदवला आहे. २ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयाचा निषेध करत हा ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणावर थेट हल्ला असल्याचा आरोप ओबीसी जनमोर्चाने केला आहे. याबाबत जनमोर्चाने राज्य सरकारकडे तातडीने कार्यवाहीसाठी अनेक मागण्या केल्या असून १५ दिवसात निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
ओबीसी जनमोर्चाने राज्य शासनाकडे दिलेल्या निवेदनानंतर प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील ओबीसी समाज (भटके-विमुक्त, बलुतेदार, अलुतेदार, विशेष मागास वर्ग) सातत्याने मराठा समाजाच्या ओबीसींमधील समावेशाला विरोध करत आहे. मात्र मराठा समाजाच्या दबावाखाली झुकून सरकार त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे सरकार मराठाधार्जिणे आणि ओबीसीविरोधी असल्याची भावना निर्माण झाल्याचेही यात नमूद केले आहे.www.konkantoday.com




