
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा दौरा
रत्नागिरी, दि. 6 :- राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) व मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्रौ 10.30 वाजता जि. सोलापूर येथून शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व मुक्काम
सोमवार 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थिती. दुपारी 1 वाजता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथून शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण व राखीव. रात्रौ 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून रत्नागिरी रेल्वेस्टेशन कडे प्रयाण. रात्री 11 वाजता रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथून कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.