
कोत्रेवाडी डंपिंग प्रकल्पाविरोधात २२ दिवसांपासून उपोषण करणार्या ग्रामस्थांची अद्यापही दखल नाही
कोत्रेवाडी डंपिंग ग्राऊंड प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी कोत्रेवाडीतील ग्रामस्थ गेल्या २२ दिवसांपासून उपोषणावर बसलेले आहेत. परंतु प्रशासनाकडून अथवा लोकप्रतिनिधींकडून त्यांची कोणतही दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोत्रेवाडीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, डंपिंग प्रकल्पामुळे परिसरातील आरोग्य, शेती व पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प कोत्रेवाडीत होवू नये, मात्र एवढे दिवस उपोषण सुरू असूनही अधिकार्यांनी अजूनही ठोस निर्णय जाहीर केलेला नाही, याबद्दल ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की, आजपर्यंत शासनाकडून प्रकल्प रद्द झाल्याची अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत उपोषण थांबणार नाही. कितीही दिवस झाले तरी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे केवळ लांजा तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आणि कोकणात कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या चिकाटीची चर्चा होत आहे.
www.konkantoday.com




