
दापोली तालुक्यातील चंद्रनगर विठ्ठलवाडी येथे सुतळी बॉम्ब कपाळाला लागून फुटल्याने मुलगी जखमी
दापोली तालुक्यातील चंद्रनगर विठ्ठलवाडी येथे २ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास फटाके वाजवत असताना एका मुलीच्या दिशेने फेकलेला सुतळी बॉम्ब तिच्या कपाळाला लागून फुटल्याने त्या मुलीला चक्कर आली. या प्रकरणी त्या मुलीने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलवाडी चंद्रनगर येथील अंकित आत्माराम कोळंबे हा २ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वा. फटाके वाजवित असताना त्याने त्यातील एक सुतळी बॉम्बची वात पेटवून तो सावली संतोष शिगवण (१८) हिच्या दिशेने फेकला. हा सुतळी बॉम्ब सावलीच्या कपाळाला लागून खाली पडला व फुटला. यामुळे सावली घाबरली व तिला चक्कर आली. याप्रकरणी तिने अंकित कोळंबे याच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संशयित अंकित कोळंबे याच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२५ (अ), २८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल पवार करीत आहेत.www.konkantoday.com




