
खेड-विरार एसटी बसच्या इंजिनने महाडजवळ पेट घेतल्याने प्रवाशांतात घबराट
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महाडनजिक खेड-विरार एसटी बसच्या इंजिनने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने प्रवाशांचा भीतीने थरकाप उडाला. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी काही काळ खोळंबली.
येथील बसस्थानकातून सुटलेली एमएच २०/बी.एल. ३४५७ क्रमांकाच्या बसमधून गणेशभक्तांना घेवून बस विरारच्या दिशेने जात होती. ही बस महाडजवळ आली असता इंजिनमधून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार बस रस्त्याच्या कडेला उभी करत सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळातच इंजिनने पेट घेतला. या घटनेनंतर गणेशभक्त दोन तास घटनास्थळीच तिष्ठत बसले. एसटी प्रशासनाने पर्यायी बस फेरीची व्यवस्था केल्यानंतर गणेशभक्त विरारच्या दिशेने रवाना झाले.www.konkantoday.com




