
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त रत्नागिरी शहरात भव्य रॅली
इस्लामिक कॅलेंडरनुसार रबी-उल-अव्वलच्या १२ व्या तारखेला साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त रत्नागिरी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांनी शहरात भव्य रॅली काढली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
ही रॅली बाजारपेठ ते जयस्तंभ, मारुती मंदिर मार्गे पुन्हा बाजारपेठेत परत अशी काढण्यात आली. रॅलीमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांतील मुस्लिम बांधवांचा सहभाग होता. शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांत मार्गाने ही रॅली पार पडली.




