
गुहागर नगर पंचायतीच्या विकास आराखड्यात सूचनांना दिली केराची टोपली.
गुहागर नगर पंचायतीचा विकास आराखडा सन २०२३ पासून जनतेसमोर येत आहे. या विकास आराखड्यावरून सर्व शहरवासीय एकत्र झाले असले तरी सूचना व हरकतींमधून कैलेल्या मागण्यांवर नगरविकास विभागाने अजूनही अंतिम निर्णय दिलेला नाही. २२ पैकी ६ मागण्यांवर निर्णय दिला असून हा निर्णय पूर्णतः नकारात्मक आहे. तर प्रलंबित ठेवलेल्या १६ मागण्यांवर अजून निर्णय होणे शिल्लक ठेवले आहे. मात्र शहरवासियांनी केलेल्या सर्वच मागण्यांना नगरविकास विभागाने ठेंगा दाखवल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही शासन पुन्हा एकदा हरकती व सूचनांसाठी हा केलेला बदल समोर ठेवणार आहे.
गुहागरच्या प्रारुप विकास आराखड्याबाबतचा शहरवासियांचा लढा थोडा शांत झालेला पहावयास मिळत आहे. विकास आराखड्यातील रस्ते, आरक्षण यावरून सर्वपक्षीय आवाज उठला. सुमारे १,६०० हरकती या विकास आराखड्यावर दाखल झाल्या. परंतु यातील बहुतांशी मागण्या फेटाळलेल्या दिसत आहेत.www.konkantoday.com




