
गुहागर येथे ८ सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची बैठक
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या पक्षाची बैठक सोमवारी (८ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता गुहागर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा वर्धापन दिन ३ऑक्टोबर रोजी क्रांती भूमी महाड येथे साजरा करण्यात येणार आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमाला जाण्यासाठी महिला-पुरुष, कार्यकर्त्यांचे आणि सभासदांचे, गाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेऊन ठाम निर्धार करण्यात येणार आहे. पक्ष संघटना वाढीसाठी सभासद मोहीम आक्रमकपणे राबवण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची गुहागर तालुक्याची संपूर्ण कार्यकारणी, तालुका माजी कार्यकारणी सदस्य, तालुका युवा कार्यकारणी, युवा सदस्य, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला वेळेत बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) गुहागर तालुकाध्यक्ष संदीप कदम, सरचिटणीस सुनील गमरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.




