
लोक सत्ता संघर्षच्यावतीने विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांचा 13 सप्टेंबर रोजी राज्य स्तरावरील गौरव सोहळा. शकील गवाणकर यांना पुरस्कार जाहीर
नगर। प्रतिनिधी -…वैभवशाली इतिहासासोबतच देदीप्यमान परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला अधिक समृद्ध करण्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या कार्याला पाठबळ देणे, पाठीवर कौतुकाची थाप देणे, हे समाज म्हणून आपले कर्तव्यच आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 12 वर्षांपासून लोक सत्ता संघर्ष ही संस्था आपले कर्तव्य समजून अशा मान्यवरांना पुरस्कारुपी सन्मान देऊन पार आलेले आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन ,कला अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘ लोक सत्ता संघर्ष’ या पुरस्काराने गौरव करण्यात येतो.महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असा नावलौकिक मिळवलेल्या, ‘लोक सत्ता संघर्ष’ पुरस्कारां’चा या वर्षीचा भव्य सोहळा शनिवार दि.१३सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 11ते 2 या वेळेत,माऊली संकुल झोपडी कँन्टीन, अहमदनगर येथे होणार आहे. या पुरस्कारात रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार,सहकारी कार्यकर्ते तसेच संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या भव्यदिव्य कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून, सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे राज्य पतसंस्था फेडरेशनचे संदीप माळी,सहकार क्षेत्रातील डॉक्टरेट डॉ. मनोज कुमार, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अलमुद्दीन वाहीद,तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.




