दापोली ते विसापूर फाटा रूंदीकरणात गेलेल्या ३५० झाडांच्या पुनर्लागवडीचा प्रयोग…


पर्यावरणाचा समतोल ढासळत असल्याने झाडे लावण्याची गरज आहे. ती वृक्षसंपदा जतन करण्याची गरज आहे. मात्र विकास देखील व्हायला हवा या उद्देशाने दापोली ते विसापूर फाटा या रस्त्याच्या रूंदीकरणात येणार्‍या तब्बल ३५० वृक्षांच्या पुनर्लागवडीचा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे समाधानाचे वातावरण आहे. दापोली सध्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले आहे. यामुळे मुंबई पुणे येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक दापोलीत येत असतात. मात्र दापोलीत येणार्‍या रस्त्यांची रूंदी कमी आहे. शिवाय रस्त्यांची अवस्था देखील खराब झालेली आहे. यामुळे दापोली ते विसापूर फाटा या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.
२४ किलोमीटरच्या या रस्त्यावर दुतर्फा ७२५ झाडे रूंदीकरणाला बाधित होती. यामुळे ही झाडे तोडून न टाकता शासनाच्यावतीने ही झाडे जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने समूळ उपटून तिथेच थोड्या अंतरावर पुन्हा मोठा खड्डा करून लावण्यात येत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button