
कोकण रेल्वेच्या वेरावल एक्स्प्रेसने वसई ते कुडाळ प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स 63 हजारच्या मुद्देमालासह अज्ञात चोरट्याने लांबविली
कोकण रेल्वेच्या वेरावल एक्स्प्रेसने वसई ते कुडाळ प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळविली. त्यामध्ये दागिन्यासह ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल होता. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना ८ ऑगस्टला सकाळी सहाच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गितांजली गणेश राऊळ (वय ५७, रा. कालेली, फकडेवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. सध्या एबी को. ऑ. हाऊसिंग सोसायटी जे. एम. नगर विरार, पश्चिम) या व त्यांचे पती, पुतणी असे विरारवरुन कुडाळ येथे गावी जाण्यासाठी वेरावल एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. रत्नागिरी रेल्वे स्टेशनहून गाडी सकाळी सहा वाजता सुटली त्यावेळी त्यांच्या उशाला असलेली पर्स अज्ञात चोरट्या सिटवरुन ओढून पलायन केले. यामध्ये ५० रुपयांची लेडीज पर्स ३० हजाराचा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, १५ हजारचे ५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३ हजाराचा सोन्याची नथ, १५ हजार रोख रक्कम, पाचशे रुपयांचा मोबाईल असा ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमालाचा समावेश होता.




