
जिल्हा परिषद सीईओं विरुद्धच नाराजी नाट्य आता ग्रामविकास मंत्र्यांकडे
रत्नागिरी: जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी शिवेनेच्या सदस्यांनी प्रशासनासह मुख्य कार्यकारी अधिकार्यांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. याची पक्षीयस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली असून,ग्राविकासमंत्र्यांकडे याबाबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.
ग्रामसेवकाचा पगार थांबविण्याच्या कारवाईवरून सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर त्याचा ठपका ठेवला होता. शिवसेनेचे सदस्य नाटेकर यांनी तर थेट अविश्वास ठराव करण्याचे मत व्यक्त केले होते. प्रशासकीय निर्णय घेताना पदाधिकार्यांना विश्वासात घेतले पाहिजे अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली.
www.konkantoday.com