
मृत समजून जेसीबी बोलावला.. पण बैल निघाला जिवंत!
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निढळेवाडी येथे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बैल गंभीर जखमी झाला. रस्त्याच्या कडेला निपचित पडलेल्या या बैलाला सुरुवातीला मृत समजले गेले. मात्र, सजग नागरिकांनी योग्य वेळी दिलेल्या मदतीमुळे त्या मुक्या जीवाचा प्राण वाचला.
संजय वाडकर हे आपल्या वाहनातून जात असताना रस्त्याच्या कडेला पडलेला बैल दिसला. मृत असल्याचा समज करून दफनासाठी जेसीबी बोलावण्यात आला. परंतु काही वेळाने बैलाने हालचाल केल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, विरेंद्र सुतार, हॉटेल मैत्री पार्कच मालक जितेंद्र सुतार व कुरधुंडा येथील तेजस जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क करून घटनास्थळी बोलावले. यावेळी डॉ. मनोहर ढाकणे सा. पशुधन विकास अधिकारी, संगमेश्वर), डॉ. सुरज जगताप व डॉ. संतोष बेंगलवाड उपस्थित राहून त्या जखमी बैलावर शर्थीचे उपचार सुरू केले. उपचारांमुळे बैलाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला चारापाणी देण्याची जबाबदारी तेजस जाधव यांनी स्वखर्चाने स्वीकारली आहे. त्यामुळे नागरिकांमधून या प्राणीमित्रांचे कौतुक होत आहे.
www.konkantoday.com




