
बिबट्यापासून संरक्षण मिळण्यासाठी श्वानांसाठी सुरक्षा कवच बनवले
पाळीव श्वासन माणसाचा विश्वासू साथीदार म्हणून ओळखला जातो. घराचे रक्षण, अज्ञात व्यक्तीवर भूंकुन लोकांना सतर्क करणे हे त्याचे काम, पण त्याला काही काळात अलोरे पंचक्रोशीतील जंगलातून रात्री उतरून येणार्या बिबट्यांमुळे या प्रामाणिक श्वानांचा जीव धोक्यात आला होता. बिबट्या हा बकरी, लहान वासरे, गुरेढोरे यांच्यासोबत भटक्या कुत्र्यांनाही आपलं लक्ष्य बनवू लागला. या गंभीर समस्येवर तोडका काढण्यासाठी श्वान प्रेमी बापू लाड आणि भरत माने यांनी एक भन्नाट अशी कल्पना लढवली. अनोखा प्रयोग हाती घेतला आहे.
बिबट्या साधारणपणे शिकार पकडताना प्रथम तिच्या मानेवर झडत घालतो. या नैसर्गिक शिकारी पद्धतीचा अभ्यास करून बापू लाड आणि भरत माने यांनी चामड्यांच्या पट्ट्यावर उलटे खिळे बसवून एक खास सुरक्षा पट्टा तयार केला. हा पट्टा श्वानांच्या गळ्यात घातल्याने बिबट्याला थेट श्वान पकडता येत नाही. परिणामी श्वानांचा जीव वाचतो. सध्या शिरगावातील शासकीय वसाहतीत लाड यांनी सांभाळलेल्या सोळा गावठी श्वानांपैकी सहा श्वानांना हा पट्टा घालण्यात आला आहे.
हे श्वान अभिमानाने गळ्यातील पट्टा मिरवत फिरताना पाहून लोकांना कुतुहल वाटते. माणसासाठी प्रामाणिकपणे पहारा देणार्या श्वानांच प्राण वाचविण्याचा हा प्रयत्न स्थानिकांच्या दृष्टीने अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे. श्वानप्रेमातून साकार झालेला हा उपक्रम आता गावकर्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून बिबट्याच्या हल्ल्यातून गावठी श्वानांना दिलासा मिळणार आहे.
www.konkantoday.com




