
राज्य शिक्षक पुरस्कारात कोकणातील शिक्षकांचे सुयश
राज्य शिक्षक पुरस्कार मध्ये कोकणातील शाळेच्या शिक्षकांनी मिळवले सुयश. यावर्षीचे शिक्षक पुरस्कार बुधवारी रात्री जाहीर करण्यात आले आहेत. प्रथमच राज्य क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद शशिकांत मयेकर यांची निवड करण्यात आले आहे. तर प्राथमिक शिक्षण गटात रत्नागिरी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा वेलदूर नवानगर येथील शिक्षक मनोज नरसी पाटील,रायगड रा.जि.प शाळा,दहिगावं ता.कर्जत जिल्हा रायगड येथील सहाय्यक शिक्षक श्री.दातीर संतोष गोपा ,सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वालावल पूर्व ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग येथील सहाय्यक शिक्षक श्री.गोसावी उदय रमाकांत.तर माध्यमिक गटात रत्नागिरी चीपळूण न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज खेर्डी चे सहाय्यक शिक्षक शिवाजी आबा पाटील. श्री.वाघमारे रवींद्र बाबू सहाय्यक शिक्षक,श्री. स.म.वडके विद्यालय,चोंढी किहीम ता.अलीबाग, जि.रायगड,श्री.शिंदे संदीप बळवंत, सहाय्यक शिक्षक, अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी मु.पो. ता.वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग., आदिवासी प्राथमिक शिक्षक या गटामध्ये श्री.काजळे रवी किसन सहाय्यक शिक्षक,रायगड जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा सुकेवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगड यांची निवड करण्यात आले आहे.
www.konkantoday.com