
मुंबई- गोवा महामार्गावर मुठवली गावच्या हद्दीत एसटी बसने एका स्कुटी दुचाकीला धडक दिल्याने स्कूटीवरून प्रवास करणारी युवती जागीच ठार…
मुंबई- गोवा महामार्गावर मुठवली गावच्या हद्दीत हॉटेल नम्रता गार्डन येथे एसटी बसने एका स्कुटी दुचाकीला धडक दिल्याने स्कूटीवरून प्रवास करणारी युवती जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
सोमवार दि.१ सप्टेंबर रोजी खेड-महाड-पनवेल- मुंबई ही एसटी महामंडळाची बस प्रवासी घेऊन मुंबईकडे भरधाव वेगाने जात होती. एसटी चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मूठवली गावाच्या हद्दीत हॉटेल नम्रता गार्डन समोर (एसबी क्र. एम. एच.२० बी.१९६०) या एसटीने खांब बाजूकडे जाणाऱ्या स्कूटी (क्र. एमएच ०६ सीएच ४६६४) या स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात स्कुटीवरून प्रवास करणारी युवती देवयानी किशोर गोळे वय वर्षे अंदाजे (वय १९ वर्षे) हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा भाऊ सुजल किशोर गोळे (वय १६ वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे.




