
सिंधुदुर्ग : विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू
गणपती विसर्जनासाठी गणेश विसर्जनस्थळी साफसफाई करताना विद्युतभारित वाहिन्यांचा धक्का बसल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सूर्याजी साबाजी कुबल (वय 25) असे मृत युवकाचे नाव असून सोबत असलेले गावचे उपसरपंच भरत लक्ष्मण गवस (32) हे विजेच्या धक्क्याने जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी गोवा-म्हापसा येथील अझीलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना सोमवारी दुपारी तालुक्यातील खोक्रल गावात घडली.
मंगळवारी सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. खोक्रल उपसरपंच भरत गवस व सूर्याजी कुबल गणपती विसर्जनस्थळी साफसफाई करण्यासाठी सोमवारी दुपारी गेले होते. तेथे झाडाझुडपांची सफाई करताना सूर्याजी याचा नकळत विद्युतभारित तारांना संपर्क झाला. याच वेळी भरत गवस यांनाही विजेचा धक्का बसला. पायात चप्पल असल्यामुळे ते दूर फेकले गेले, तर सूर्याजीचा जागीच मृत्यू झाला




