
कोकणातील ’चाकरमानी’ नव्हे तर ’कोकणवासी’ला लोकांची पसंती
कामानिमित्त गावाकडील तरुण, तरुणी, नागरिक मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात जातात. मात्र हेच नागरिक कोकणातील मोठा सण समजला जाणार्या गणेशोत्सवासाठी उत्साहात कोकणात येतात. त्यामुळे या नागरिकांसाठी चाकरमानी हा शब्द पिढ्यानपिढ्या वापरला जातो. मात्र आता या चाकरमानी शब्दाला राज्य शासनाने ’कोकणवासी’ अशी नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत चर्चाना आता उधाण आले आहे. याबाबत तरुण भारत संवादने ’चाकरमानी’ की कोकणवासी यावर प्रतिक्रिया घेतल्या आहेत. यामध्ये बहुतांश नागरिकांनी कोकणवासी या शब्दाला पसंती दिली आहे.
गावाकडून मुंबईला गेलेले नागरिक गणेशोत्सव, शिमगा या सणांना कुटुंबासोबत गावात येतात आणि या पूर्ण कुटुंबालाच चाकरमान्यांचे कुटुंब असे संबोधले जाते मोल, या शब्दावरून अनेक संघटनांनी
निराशा व्यक्त केली आहे या संदर्भात काही संघटनांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे औपचारिक मागणी केली होती त्यांनी ’चाकरमानी’ या शब्दाऐवजी ’कोकणवासी’ हा शब्द अधिक सन्मानजनक आणि योग्य असल्याचे मत मांडले.www.konkantoday.com




