
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याच्या हालचालींना वेग
शेतकरी, मच्छीमार यांना हवामानविषयक अचूक माहिती प्राप्त व्हावी, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या दृष्टीने जागांची चाचपणी सुरू असून त्याचा अहवाल ग्रामपंचायतींकडून मागविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या स्वयंचलित हवामान केंद्रांना मूर्त रूप प्राप्त होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये हवामानविषयक अचूक माहिती प्राप्त व्हावी, शेतकर्यांना हवामानाधारित कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन प्राप्त व्हावे, कृषी हवामान क्षेत्रात संशोधनासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने मच्छीमारांसाठी हवामानविषयक आवश्यक ती माहिती प्राप्त व्हावी आदी बाबींच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय गतवर्षी घेण्यात आला होता.
www.konkantoday.com




