
2, 4,6 व 7 सप्टेंबर रोजी वाहतूक मार्गात बदलरामनाका ते काँग्रेस भवन मार्गावरील वाहतूक बंदरामनाका तेलीअळी आठवडा बाजार चौक भुते नाका मांडवी पर्यायी मार्ग
रत्नागिरी, दि.1 ) : मंगळवार 2 सप्टेंबर रोजी गौरी गणपती, 4 सप्टेंबर रोजी 9 दिवसांचे गणपती, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी आणि 7 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तींचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवशी रामनाका-राधाकृष्ण नाका- गोखले नाका- विठ्ठल मंदिर- काँग्रेस भवन या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली असून, रामनाका-तेलीअळी नाका- आठवडा बाजार चौक-भुते नाका-मत्स्यालय- मांडवी समुद्र किनारा या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरु राहील. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिध्द केली आहे.
या अधिसूचनेत म्हटले आहे, दि.2सप्टेंबर रोजी गौरी गणपती, दि.4 सप्टेंबर रोजी नऊ दिवसाचे गणपती,
दि.6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी व दि. 7 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तीचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. यावेळी मांडवी समुद्रकिनारी गणेशमूर्ती विसर्जन करणा-या प्रत्येक गणेश मूर्तीसहीत वाहने येत असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मांडवी समुद्र किनारी सार्वजनिक व खासगी गणपती मूर्ती वाहनातून विसर्जन करण्यासाठी रामनाका – राधाकृष्ण नाका – गोखलेनाका विठ्ठल मंदिर – काँग्रेस भवन या मार्गाने मांडवी समुद्र किनारी जातात.
या मुदतीत मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ परिसरात भाविकांची व खरेदीदार यांची वर्दळ असल्याने जे भाविक
गणपती विसर्जनाकरिता वाहने घेऊन येणार आहेत, त्यांच्याच वाहनांना आत प्रवेश देवून अन्य वाहनांना प्रवेश
प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्याकरिता गणपती विसर्जन दरम्यान दि.2, 4, 6 व 7 सप्टेंबर रोजी 12 ते 24 वाजेपर्यंत गणेशमूर्ती विसर्जनाकरिता येणा-या वाहनांव्यतिरीक्त अन्य वाहनांना रामनाका राधाकृष्ण नाका- गोखलेनाका विठ्ठल मंदिर काँग्रेस भवन मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून रामनाका-तेलीआळी नाका- आठवडा बाजारचौक- भुतेनाका मत्स्यालय -मांडवी समुद्र किनारा या मार्गावर वाहतूक सुरु राहणार आहे.
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय व मंत्री महोदय यांच्या दौ-याच्या अनुषंगाने परवानगी दिलेली वाहने यांना लागू होणार नाही.