
रिपब्लिकन पक्षाच्या दापोलीतील पदाधिकाऱ्यांनी घेतली रामदास आठवले यांची भेट
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या दापोली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेऊन सामाजिक, धार्मिक आणि राजकीय विषयांवर सकारात्मक चर्चा केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या ३ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या वर्धापनदिनाचे नियोजन आणि महाबोधी बुद्ध विहार मुक्ती संदर्भात आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दलित मित्र पुरस्कार प्राप्त आणि रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य दादासाहेब मर्चंडे, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक दिलीप काकडे, पुणे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, सरचिटणीस दिनेश रुके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




