
वज्रमूठ दाखवा, जरांगेंच्या पाठीशी उभे रहा, संदीप सावंत यांचे आवाहन
मनोज जरांगे सारखा एक सामान्य शेतकरी वंचितासाठी लढतो आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. आता आपली जबाबदारी आहे. एकत्र या, वज्रमूठ तयार करा आणि मनोज जरांगे यांच्यापाठी खंबीर उभे रहा, आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर हीच संधी आहे. गणरायाला वंदन करून बाहेर पडा आणि आंदोलनात सामील व्हा, असे आवाहन अखिल भारतीय जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यानी केले आहे. आता थांबायचे नाय, लढायचे आहे. आता नाही तर मराठा महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी केले आहे. आता थांबायचे नाय, लढायचे आहे, आता नाही तर कधीच नाही हे लक्षात असू द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com




