
आरोपी दुर्वासला भक्तीशी लग्न करायचे नव्हते म्हणून काटा काढण्यासाठी दोन साथीदारांच्या मदतीने बियर बार मध्ये केला खून, व मृतदेह आंबा घाटात फेकला
रत्नागिरी शहरातील मिरजोळे येथे राहणारी भक्ती जितेंद्र मयेकर या तरुणीचा खून तिचा प्रियकर दुर्वास पाटील राहणार खंडाळा याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे आता उघड झाले आहे याप्रकरणी पोलिसांनी दुर्वास दर्शन पाटील राहणार वाटद खंडाळा, विश्वास विजय पवार राहणार आणि बौद्धवाडी कळझोंडी सुशांत शांताराम नरळकर वाटद खंडाळा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील दुर्वास याचे भक्ती हिच्याशी प्रेम संबंध होते त्यातून ती गरोदर राहिली होती परंतु त्यानंतर दूर्वासने तिच्याशी लग्न न करता आपले दुसरे लग्न ठरवले होते
यातील फिर्यादी हेमंत जितेंद्र मयेकर राहणार मिरजोळे यांचीमोठी बहिण भक्ती जितेंद्र मयेकर हि , दि. १६/०८/२०२५ रोजी दुपारी १५.०० वा घरामधुन प्रशांत नगर
रत्नागिरी येथील भाड्याच्या रुमवर जात आहे असे सांगुन मिरजोळे येथील घरामधुन घरातील माणसांना सांगुन निघुन गेलेली होती. त्यानंतर दि. १७/०८/२०२५ रोजी पासुन तिचा फोन बंद येवु लागला होता म्हणुन फिर्यादी यांनी वाट बघुन तिसरे दिवशी प्रशांत नगर येथील ती राहत असलेल्या भाड्याचे घरी पाहिले त्यावेळी त्या मला लॉक होते. फिर्यादी यांनी
भक्ती हिच्या मित्र
मैत्रीणी, तसेच त्यांचे नातेवाईक यांच्याकडे शोध घेवुन ती मिळुन आली नव्हती. म्हणुन फिर्यादी यांनी स्वतः रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे भक्ती जितेंद्र मयेकर ही नापत्ता झालेबाबत दिले तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोसील ठाणे नापत्ता रजि नं. ७८/२०२५ दिनांक २१/०८/२०२५ रोजी दाखल आहे फिर्यादी यांची खात्री झाली की, बहीण भक्ती जितेंद्र मयेकर हिचे यातील आरोपीत दर्वास पाटील, याच्याशी प्रेमसंबंध होते फिर्यादी यांचे घरातुन तीला दुर्वास पाटील याच्याशी लग्न करण्याकरीता विरोध नव्हता, परंतु आरोपीत दुर्वास पाटील याचे लग्न ठरल्याचे भक्ती हिला माहिती मिळाली असावी म्हणुन तिने पळुन जावुन आरोपीत दुर्वास पाटील याच्याशी लग्न केलेले असावे असे फिर्यादी यांचे घरातील सर्व लोकांना वाटत होते म्हणुन फिर्यादी अजुन पर्यंत भक्ती मयेकर मिळन येण्याची वाट बघत होते. पण अद्याप पर्यंत फिर्यादी यांची मोठी बहिण भक्ती मयेकर हि मिळुन आलेली नाही म्हणून फिर्यादी यांची खात्री पटलेली आहे की, तिचा प्रियकर दुर्वास पाटील याने त्याचे दुस- या मुली बरोबर ठरलेले लग्न भक्ती हिच्यामुळे तुटु नये याकरीता त्याने जाणीव पुर्वक तिचे अपहरण केलेले आहे. व तीचा घात केलेला असावा असा फिर्यादी यांचा संशय आहे. म्हणुन.
त्यानंतर आरोपी नं १ याच्याकडे तपासाच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता यातील आरोपी क्र. १ दुर्वास पाटील याचे व मयत भक्ती मयेकर या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. सदर प्रेमसंबंधातातून मयत भक्ती ही गरोदर राहिल्याने तिने आरोपी क्र. १ याच्याकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला. मात्र आरोपी क्र. १ दुर्वास पाटील यास तिच्यासोबत लग्न करावयाचे नसल्याने तिचा अडसर दूर करण्यासाठी त्याने
आरोपी क्र. २ व ३ यांच्याशी मिळून कट रचून भक्ती हिला रत्नागिरी येथून खंडाळा येथे आरोपी क्र. १ याच्या सायली देशी बारमध्ये बोलावून त्याठिकाणी बारच्या वरच्या रुममध्ये आरोपी क्र.१ व २ यांनी तिचा केबलने गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आरोपी क्र. ३ याने आणलेल्या वॅगनआर गाडीतून खंडाळा येथून आंबाघाट येथे नेवून घाटाच्या परिसरात फेकून दिला
शनिवारी पोलिस आणि कुटुंबीयांनी आंबा घाटात शोध घेतला असता दरीत भक्तीचा मृतदेह सापडला. चेहरा विद्रूप झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते; मात्र तिच्या हातावरील टॅटूमुळे ओळख निश्चित करण्यात आली.