
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला भारत देश वेगाने प्रगती करतं आहे-माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला भारत देश वेगाने प्रगती करतं आहे.समाजातील सर्व घटकांचा विचार करणारे हे सरकार आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशात सर्वत्र सहकार चळवळ रुजवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात नवे सहकारी धोरण अमलात येत असून गावागावात सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकाराचे जाळे निर्माण होईल. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकारी, मच्छिमार, व्यापारी, उद्योजक यांसह सर्वांच्या हिताचे निर्णय घेणारे हे सरकार आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मालवण मेढा येथील निवासस्थानी आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सौ. उमा प्रभू, अमेय प्रभू, विजय केनवडेकर, किसन मांजरेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक भांडवल पुरवण्यासाठी को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याची योजना आहे. या बँकेची संकल्पना सुरेश प्रभू यांनी सारस्वत बँकेचे अध्यक्ष असताना मांडली होती, परंतु तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळाला नव्हता. आता, सरकारने धोरणात्मक बदल केल्यामुळे हा परवाना मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या नवीन धोरणांतर्गत ज्या सहकारी संस्था कमकुवत आहेत. त्यांना बळकट केले जाईल आणि प्रत्येक गावात एक नवीन सहकारी संस्था स्थापन केली जाईल. या संस्थांच्या माध्यमातून गोडाऊन, पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी यांसारखे उपक्रम सुरू करण्यातही आले आहेत. यामुळे येत्या काळात सहकार क्षेत्रात चौपट वाढ होण्याची शक्यता आहे. असेही प्रभू म्हणाले. विविध विषयांवर सुरेश प्रभू यांनी भाष्य केले.
कोकणाचा विचार करता अवकाळी पाऊस अनियमित थंडी यासह हवामानातील अन्य बदलांचा परिणाम शेतकरी बागायतदार मच्छीमार या सर्वानाच भोगाव लागत आहेत. घेतलेल्या उत्पादनाचे मोठे नुकसान होते. म्हणूनच आज निसर्गाचे जे नियम आहेत त्यावर आधारित अर्थ व्यवस्था याबाबतही निश्चितच गरजेचे आहे. आपले सरकार सर्वच बाबतीत विचार करून जन हिताचे निर्णय घेत आहे.




